
अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या तब्बल ३७२ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शासन आदेशानुसार पात्र शिक्षकांच्या फाईलवर स्वाक्षरी केल्याने संबंधित शिक्षकांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा झाला आहे. ही पेन्शन मिळाल्याने गुरुजींचे टेन्शन गेले आहे.