पारनेर - आम्ही सत्तेत होतो, त्यावेळी आम्ही शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्या काळात शिवाजीराव पाटील व इतर शिक्षक नेते होते त्यांच्याशी चर्चा करून आम्ही प्रश्न मार्गी लावत होतो..आम्ही त्या काळी केंद्र सरकार जे देते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना वेतन आम्ही देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना संघर्षाची वेळ आली नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षजेष्ठ नेते शरद पवार यांनी केले.संसद पाहण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील २०० शिक्षकांना दिल्लीला घेऊन गेलेल्या खासदार नीलेश लंके यांनी आज (ता. २२) पवार यांची भेट घडवून आणली. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत केले त्यांनी केलेल्या स्वागतामुळे शिक्षक अरक्षशः भारावून गेले..या वेळी पाऊस आल्याने ते म्हणाले, आम्ही तर तुमचं स्वागत केलंच, पण वरूण राजानेही केले हे विशेष. या भागात फारसा पाऊस पडत नाही, पण वरूण राजालाही कळलं की हे शिक्षक दुष्काळी भागातून आले आहेत! हा विनोदाचा क्षण क्षणभरात स्मितहस्याने रंगला.यावेळी शिक्षकांनी त्यांच्या समस्या पवार यांच्यासमोर मांडल्या. तुमच्या समस्यांमध्ये आम्ही लक्ष घालू..यावेळी पवार यांनी शिक्षकांशी संवाद साधताना किती साली शिक्षक झालात? त्यावेळी किती पगार होता? कधी निवृत्त झालात? आता किती निवृत्तीवेतन मिळते असे प्रश्न विचारले. त्यावर सुरूवातीचा पगार ९५ रूपये तर आता ४० हजार रूपये निवृत्तीवेतन मिळत असल्याचे उत्तर शिक्षकाकडून देण्यात आल्याने पवार खखळून हसले. तुमच्यामुळेच आमचे जीवन सुखकर झाल्याचे शिक्षकांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.तुम्ही काल संसदेचे कामकाज पाहिले. त्यासाठी तब्बल २०० पासेस मिळाले याचे मला आश्चर्य वाटले. मी अनेक वर्षे दिल्लीत आहे, परंतू पाच-दहा लोकांपेक्षा अधिक पासेस आम्हाला कधीही मिळाले नाहीत. लंके यांनी काय जादू केली माहीत नाही असे म्हणताच एकच हशा पिकला..ज्या शिक्षकांनी अनेक पिढया घडविल्या, त्यांच्या ॠणातून उतराई झाले पाहिजे या भावनेतून मी शिक्षकांसाठी नेहमी काही ना काही करत असतो. त्यामुळे निवृत्त शिक्षकांच्या दिल्ली दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते.- नीलेश लंके, खासदार..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.