
पारनेर: शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनावर सातत्याने संस्कार करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हेच भान ठेवत खासदार नीलेश लंके यांनी २०० सेवानिवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी शिक्षकांना कृतकृत झाल्याचे जाणवले.