
राहुरी : देवळाली प्रवरा येथील १९ जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह पोस्कोअंतर्गत दाखल खोटा गुन्हा मागे घ्यावा. शहरातील राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेतील आरोपींची नावे जाहीर करावी. येत्या दहा दिवसांत मागण्या मान्य केल्या नाही, तर राज्यभर आंदोलन केले जातील, असा इशारा मराठा एकीकरण समितीतर्फे समन्वयक देवेंद्र लांबे यांनी दिला आहे.