कोरोना संकट टळू दे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान होऊ दे

आनंद गायकवाड
Saturday, 22 August 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मिशन बिगीन अगेनमुळे नागरिकांच्या संचारावरील बंधने शिथील करण्यात आली असली तरी, कोरोनाचे संकट संपलेले नसल्याने या पुढील काळातही काळजी घेणे आवश्यक आहे.

संगमनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मिशन बिगीन अगेनमुळे नागरिकांच्या संचारावरील बंधने शिथील करण्यात आली असली तरी, कोरोनाचे संकट संपलेले नसल्याने या पुढील काळातही काळजी घेणे आवश्यक आहे. 

गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा सोहळा आहे. मात्र यावर्षी सुरक्षा आणी स्वच्छतेला प्राधान्य देत गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. जगावर आलेले कोरोना संकट टळू दे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान होऊ दे, अशी प्रार्थनाही त्यांनी गणरायाला केली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, कोवीडच्या जागतिक संकटाने सर्वांना त्रस्त केले आहे. 
त्यामुळे आपण सर्वांनी स्वयंशिस्त आणि संयम दाखवित एकजुटीने परिस्थितीशी सामना करण्याची आवश्यकता आहे.

दरवर्षीचा गणेशोत्सवाच्या उत्साहाला थोडा आवर घालून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरगुती व सार्वजनिक मंडळांनी हा उत्सव साजरा करणे काळाची गरज आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करताना कोविडचा संसर्ग होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. मनामध्ये सद्भावना आणि सामाजिक भान ठेवून उत्सव साजरा करण्याचे आवाहन थोरात यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue Minister Balasaheb Thorat appealed to make Ganeshotsav simple