
कुकाणे: वडुले (ता. नेवासा) येथील युवा शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. भाजप सरकारच्या कर्ज मुक्तीच्या खोट्या आश्वासनाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व सर्वपक्षीयांच्या वतीने कुकाणा येथे शेवगाव- नेवासे राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनअर्धा तास सुरू होते. मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.