
राहुरी : कात्रड येथे सोमवारी (ता.२८) पहाटे घरफोडीच्या तयारीतील पाच जणांच्या टोळीतील एकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरोड्याचे साहित्य व वाहन जागेवर सोडून चार जणांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.