
अहिल्यानगर : अहिल्यानगरहून पुण्याकडे कारने जात असताना चास (ता. अहिल्यानगर) गावच्या शिवारात बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर लघुशंकेसाठी थांबलेल्या कुटुंबाला कोयत्याने मारहाण करत त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दोघा लुटारूंनी कारमधील महिलांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले आहेत. हा प्रकार मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडला.