वडाळा बहिरोबा येथे दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास

Robbery at Wadala Bahiroba
Robbery at Wadala Bahiroba

नेवासे फाटा : वडाळा बहिरोबा (ता.नेवासे) येथील बापूसाहेब केशव मोटे यांच्या वस्तीवर दरोडा पडला. रविवारी (दि.9) पहाटे एक वाजेच्या सुमारास हा दरोडा पडला. दरोडेखोरांना विरोध करताना किशोर बापूसाहेब मोटे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला वडाळा बहिरोबा येथील एफ.जे.एफ.एम. मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

1 लाख 28 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिण्यांसह 1 लाख 17 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 45 हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या घटनेमुळे वडाळा बहिरोबा परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

दरोडा पडल्याची खबर मिळताच शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक वंसत भोये घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दीपाली काळे -कांबळे, शेवगांव उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी मध्यराञी घटनास्थळी भेट देवून श्वान पथकाला पाचारण केले.

या घटनेची पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी गोंडेगांव येथील दोन संशयितांना ताब्यात घेवून गजाआड केले आहे. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

बापूसाहेब मोटे यांचा महामार्गावर हाकेच्या अंतरावर बंगला असून या बंगल्याचा दरवाजा कटावणीच्या साह्याने तोडून दोन चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला.उचकापाचक सुरु केली.

बंगल्यात झोपलेल्या बापूसाहेब मोटे व त्यांच्या पत्नी चंद्रकला मोटे यांच्या खोलीमध्ये उचका पाचक सुरु केली. चोरट्यांनी बाहेरुन दरवाजा बंद करत त्यांचा मुलगा व सुन झोपलेल्या खोलीकडे आपला मोर्चा वळविला. त्यांचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे कटावणीच्या साह्याने दरवाजाचा कडीकोयंडा उचकाटून आत प्रवेश केला यावेळी चोरट्यांनी ओमसह दोन तोळे सोन्याचे लॉकेट, सोन्याच्या दोन अंगड्या, दोन मंगळसुत्र असा ऐवज हस्तगत केला. शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा असलेल्या 1 लाख 17 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

चोरट्यांनी किशोर मोटे यांच्या डोक्यात कटावणीचा जोरदार हल्ला चढविल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. चोरटे बंगल्याच्या मागील दरवाजाने पळ काढून पसार झाले. पाय रक्ताने माखल्यामुळे चोरट्यांच्या पायाचे ठसे उमटलेले होते. घटनेनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा एकनाथ दशरथ मोटे व सुखदेव कोंडीराम साळवे यांच्या वस्तीकडे वळविला.

श्वान पथकाने चोरट्यांचा माग शोधला असता अमरप्रित हॉटेलच्या चारीपर्यंत गेला. या प्रकरणी बापूसाहेब केशव मोटे यांनी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक पवार यांनी ताब्यात घेवून गजाआड केले आहे.

संपादन  - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com