अहिल्यानगर : आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘एमसीए अकादमी’ सुरू करण्यात येणार आहे. संघटनेचे माजी अध्यक्ष अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यात राज्य पातळीवरची अकादमी सुरू केली जाईल, तर विभागीय स्तरावर पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापुरात, कोकण विभागासाठी दापोली, मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि खांदेशसाठी जळगाव, अशा चार ठिकाणी विभागीय क्रिकेट अकादमी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एमसीए’चे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली.