महाराष्ट्रात जे घडलं तेच अमेरिकेत होईल, बायडेन यांच्या "सातारा स्टाईल" भाषणावर रोहित पवारांचं ट्विट

अशोक निंबाळकर
Friday, 30 October 2020

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे महाराष्ट्राप्रमाणेच देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचला आहे.

नगर ः अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोचला आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे प्रतिस्पर्धी उमेदवार बायडन यांनी आव्हान उभे केले आहे. त्यांच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होत आहे. अमेरिकेत सध्या परिवर्तन व्हावे, अशी जगभरातील बुहतांशी देशांची इच्छा आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील साताऱ्याच्या सभेची पुनरावृत्ती झाली आहे.

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे महाराष्ट्राप्रमाणेच देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचला आहे. बायडन यांच्यामुळे ट्रम्प यांच्या उरात धडकी भरली आहे. फ्लोरिडा येथे नुकतीच बायडन यांची प्रचार सभा झाली. त्यांच्या भाषणावेळी पावसाला सुरूवात झाली. त्या भर पावसातही बायडन यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. हे तेथील लोकांना चांगलंच भावलं आहे.

या सभेनंतर बायडन यांनी स्वतः ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. या बाबत राष्ट्रवादीचे संस्थापक ज्येष्ठ नेते यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान पावसात भाषण केलं होतं. त्या भाषणानंतर संपूर्णपणे राजकीय वातावरण फिरलं आणि विजयाची खात्री वाटणाऱ्या भारतीय जनता पक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायउतार व्हावं लागलं होतं. याच ऐतिहासिक सभेची आठवण शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी करून देत ट्विट केलं आहे. तेच ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

 

‘वादळ संपून नवा दिवस उजाडेल’, अशा आशयाचे ट्विट बायडन यांनी केलं आहे. या पूर्वीही त्यांनी तेथील भारतीयांची मते घेण्यासाठी ट्रम्प यांच्याबाबत ट्विट केलं होतं. ट्रम्प हे भारताला घाणेरडा देश म्हणाल्याची आठवण त्यांनी करून दिली होती. ट्रम्प यांच्या एकाधिकारशाहीला तेथील जनता वैतागली आहे. त्यामुळे तेथे परिवर्तन घडण्याची शक्यता आहे. ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. ४ नोव्हेंबरला नवीन राष्ट्राध्यक्ष सत्तेवर येईल. सत्तापरिवर्तन होईल असा अंदाज रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Pawar predicts political change in America