भाजपच्या नेत्यांना साष्टांग दंडवत... अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही; या नेत्याकडून भाजपला त्यांच्या विधानाची आठवण

Rohit Pawar reply to BJP on Supreme Court verdict in Sushant Singh case
Rohit Pawar reply to BJP on Supreme Court verdict in Sushant Singh case

अहमदनगर : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोटाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात राजकीय टीकाठिपणी सुरु झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष केले असून महाविकास आघाडीतील नेते सुद्धा आता मैदानात उतरले असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सलग चार ट्विट केले आहेत. ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही’ म्हणत ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपच्या नेत्यांना ‘सांष्टांग दंडवत’ असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लागावला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासणीबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सरकार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयंते’ असं म्हणत ट्विट केले होते.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सलग चार ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत'. 

‘आधी 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर 'मेरा अंगण मेरा रणांगण' या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं. 'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.'

न्यायालयाच्या आदेशामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकाणाचा तपास मुंबई पोलिसांकडून आता सीबीआयकडे गेला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे जाताच राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपच्या नेत्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. 

याबाबत कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ‘सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर आहे. सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार व मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

पुढे आमदार पवार यांनी असं म्हयलंय की, शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपाचे मोठे नेते सुप्रीम कोर्टवर टीका करत होते. याचा आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टिका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत, असंही आमदार पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com