
-सचिन गुरव
सिद्धटेक : उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता त्यातून शेतीसाठी रब्बी आवर्तन सोडण्यास सुरवात झालेली आहे. धरण व्यवस्थापनाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी आवर्तनाचे काटेकोरपणे नियोजन केले असून, अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात उन्हाळ्यात ओढवणारे पाणी संकट रोखण्यासाठी या बैठकीत कोणत्याही प्रकारची तरतूद किंवा उपाययोजना करण्यात आली नसल्याची खंत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.