कर्जत/ जामखेड : पावसाळी अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील राशीन खंडणी व मारहाण प्रकरणी पोलिसावर कोणी दबाव आणला, याची चौकशी करावी, तसेच जामखेड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यात यावी या प्रश्नी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली.