कर्मवीर काळे काऱखान्याच्या उपाध्यक्षपदी रोहोम

मनोज जोशी
Friday, 7 August 2020

आमदार आशुतोष काळे यांनी कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे. हे माझ्यासारख्या तरूण संचालकासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. कोपरगाव तालुक्याच्या विकासाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

कोपरगाव : कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सुधाकर कोंडाजी रोहोम यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना उपाध्यक्ष रोहोम म्हणाले, कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच सर्वसामान्य प्रत्येक कार्यकर्त्यांवर कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे  प्रेम केले. कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी ही परंपरा पुढे चालविली.

हेही वाचा - डॉ. आंबेडकरांचे पुस्तकात नाव नसल्याने संताप

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे. हे माझ्यासारख्या तरूण संचालकासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. कोपरगाव तालुक्याच्या विकासाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

यावेळी बोलतांना मावळते उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी रोहोम यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी एस.डी.शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक सह.संचालक रामेंद्रकुमार जोशी व सहाय्यक म्हणून एस.व्ही.सूरम यांनी काम पाहिले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचा संचालक मंडळाच्या सत्कार करण्यात आला. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohom as vice president of the Karmaveer kale Factory