
-शुभम गोरे
अहिल्यानगर : लग्नसराईमुळे जानेवारीत अन् व्हॅलेंटाईन डेमुळे फेब्रुवारी महिन्यात फुलांना मागणी वाढते. त्यामुळे फुलांचे भाव तेजीत आहेत. व्हॅलेंटाईन डेमुळे सध्या गुलाबाने चांगलाच भाव खाल्ला असून, ४० हजार रुपये क्विंटल भावाने गुलाबाची विक्री होत आहे. किरकोळ बाजारात मात्र गुलाबाच्या फुलांच्या गड्डीला २०० ते ३०० रुपयांनी विक्री होत आहे.