
Onion Farmers in Sangamner Distressed After Crop Hit by Leaf Curl Disease
Sakal
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे राजेंद्र लक्ष्मण दिघे या तरुण शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रातील कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरविला. करपा रोगाच्या प्रादुर्भावाने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.