

संगमनेर : जिल्हा नियोजित व विकास समितीच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने संगमनेर तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांसह जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे बांधकाम, तसेच अन्य नागरी सुविधांची कामे केली जातील.