
पारनेर : अहिल्यानगर - पुणे महामार्गावर रात्रीची गस्त घालत असताना सुप्याजवळील पवारवाडी घाटात पोलिसांनी ११ लाख दोन हजार पाचशे रुपयांची प्रतीबंधित सुगंधी तंबाखू ताब्यात घेतली. मालट्रक पुण्याकडे जाताना थांबवून त्याची चौकशी केली असता तंबाखू आढळून आली. २८ लाख दोन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल सुपे पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी मदतनीस मोसीन अकबर खान (वय २० रा. गोलागुठाण, मध्य प्रदेश) व चालक संजय यादव (रा. मध्यप्रदेश) या दोघांविरोधात सुपे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.