esakal | गोदावरी कालव्यांसाठी आणखी ४४ कोटी रूपये
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ashutosh Kale

गोदावरी कालव्यांसाठी आणखी ४४ कोटी रूपये, आ. काळेंचे अभिनंदन

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

कोपरगाव ः ‘‘गोदावरी कालव्यांवरील जीर्ण बांधकामे नव्याने बांधण्यासाठी चाळीस कोटी रुपयांच्या खर्चास जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी दिलेली प्रशासकीय मान्यता ही कालवे रुंदीकरणाची सुरवात आहे. आणखी ४४ कोटी रुपयांच्या खर्चास लवकरच मान्यता मिळेल. कालव्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण दाबाने पाणी पोहचविण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे,’’ असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी केले.

गेल्या बारा वर्षांपासून प्रलंबीत असलेले हे काम काळे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणले. त्याबद्दल कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने राजेंद्र बावके, रावसाहेब गाढवे, महेंद्र शेळके व गौतम बॅंकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते यांच्या हस्ते पेढा भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. (Rs 44 crore will be provided for Godavari canals)

हेही वाचा: माजी मंत्री राम शिंदेंची कन्या झाली सोलापूरची सून

काळे म्हणाले, ‘‘वहनक्षमता कमी झाल्याने उजवा कालवा सव्वाचारशे क्सूसेक्स वेगाने वाहतो. त्याची क्षमता सव्वासातशे क्यूसेक्स, तर डावा कालवा तीनशे क्यूसेक्सने वाहतो. त्याची क्षमता सव्वाचारशे क्यूसेक्स करायची आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २२ जीर्ण बांधकामे पूर्ण करण्यासाठी चाळीस कोटी रुपये खर्चाच मान्यता मिळाली. उर्वरित बांधकामे पूर्ण करण्यासाठी आणखी ४४ कोटी रुपये खर्चास मान्यता मिळेल.

ही कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. त्यानंतर वेगाने मातीकाम पूर्ण करून कालव्यांची वहनक्षमता वाढविणे शक्य होईल. गोदावरी कालव्यांच्या दृष्टीने हा क्रांतिकारक निर्णय झाला आहे.’’

कमी कालावधीत आवर्तन पूर्ण होईल

आपण सातत्याने पाठपुरावा केल्याने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गोदावरी कालवे रुंदीकरणच्या दृष्टीने हा निर्णय घेतला. गोदावरी कालव्यांची वहनक्षमता दीडपटीने वाढली की कमी कालावधीत आवर्तन पूर्ण होईल. ओव्हर फ्लोचे जास्ती जास्त पाणी लाभक्षेत्रात जिरविणे व साठविणे शक्य होईल. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

-आमदार आशुतोष काळे, कोपरगाव.

(Rs 44 crore will be provided for Godavari canals)

loading image