esakal | अन्यथा तुमचे गाल रंगविल्याशिवाय गप्प बसणार नाही; दरेकरांच्या वक्तव्याचा समाचार
sakal

बोलून बातमी शोधा

rupali chakankar

...तर त्यांचा गाल रंगवू; दरेकरांच्या वक्तव्याचा समाचार

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

निघोज (जि.अहमदनगर) : तुम्ही राज्यातील महिलांचा अपमान करणार असाल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. तुम्ही तमाम महिलांची जाहीर माफी मागा, अन्यथा आम्ही तुमचे गाल रंगविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) दिला आहे.

दरेकर यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना, राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही चाकणकर यांनी यावेळी दिला. निघोज येथील आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा गुंड, माजी आमदार पोपटराव गावडे, कन्हैया उद्योगसमूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, राजश्री कोठावळे, दीपक सरडे उपस्थित होते.

हेही वाचा: कर्जदार, पतसंस्थांना दिलासा! सरकारची पुन्हा एकदा मुदत वाढ

हेही वाचा: नगर : तहसीलदार देवरेंच्या कारभाराची लाचलुचपत विभागाकडे तक्रार

चाकणकर म्हणाल्या, की पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पक्ष नेटाने पुढे घेऊन चाललो आहोत. असे असताना विरोधकांना हे पाहवत नाही. महाविकास आघाडी सरकार कधी पडेल, याची वाट पाहणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र, स्वतःला मूल होत नसल्याने दुसऱ्याचे बाळ पाळण्यात टाकणारे अनेक आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद व युवा नेते रमेश वरखडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रास्ताविक शांताराम कळसकर यांनी केले, तर सोमनाथ वरखडे यांनी आभार मानले.

loading image
go to top