esakal | नगर : तहसीलदार देवरेंच्या कारभाराची लाचलुचपत विभागाकडे तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

complaint against Tehsildar Jyoti Deore

नगर : तहसीलदार देवरेंच्या कारभाराची लाचलुचपत विभागाकडे तक्रार

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कारभाराविषयी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. वाळू वाहनांवरील कारवाई, जमिनीचे अकृषणमध्ये रुपांतर करणे, जमीन प्रकरणात संशयास्पद निर्णय देणे आदींचा या तक्रारीमध्ये समावेश असून सामाजिक कार्यकर्ते कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी ही तक्रार केली आहे. या प्रसंगी ऍड. असिम सरोदे उपस्थित होते.


तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली होती. यात त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार नीलेश लंके आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. या भावनिक क्‍लिपमुळे राज्यातील राजकारण तापले होते. आमदार लंकेंवर भाजपकडून आरोप करण्यात आले होते. देवरे यांच्या कार्यपद्धतीबाबत आरोपही झाले होते, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठविला होता. राज्य शासनाने देवरे यांची बदली केली. तहसीलदार देवरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर ऍड. सरोदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: गुड न्यूज : पाणी संकट टळले! नगर, नाशिकची धरणे भरली


ऍड. सरोदे म्हणाले, देवरे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीचा मुख्यतः आधार जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीचा अहवाल आहे. वाळूचा उपसा, जमिनीचा अकृषक वापर रुपांतरीत करून देणे अशा अनेक ठिकाणी त्यांनी पदाचा दुरूपयोग केला आहे. त्यांनी जेसीबी, डंबर, ट्रॅक्‍टर अशी वाहने जप्त केली. त्यांनी कोणतेही तडजोड शुल्क शासनाकडे जमा केले नाही. त्यांची कारवाई संशयास्पद आहे. जमिनीचे अकृषक रुपांतर करताना अधिकार नसताना मंजुरी दिल्याचे अहवालात नमूद आहे.

त्या जळगाव जिल्ह्यात या पूर्वी होत्या. तेथेही त्यांनी जमिनीच्या प्रकरणात निर्णय संशयास्पद दिले आहेत. हा तक्रार अर्ज हा ज्योती देवरे यांच्या सारख्या प्रवृत्ती विरोधात हा अर्ज आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दबाव सहन करावे लागतात. तसा जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर मी स्वतः वकील म्हणून त्यांच्या बाजूने आहे. देवरे यांनी जो ऑडिओ प्रसारीत केला. यातून भावनिकतेचे कवच आपल्या स्वतः भोवती निर्माण करून चौकशीतून आपली सुटका व्हावी, अशा प्रकारचा अभिनय ऑडिओच्या माध्यमातून करणे हा सुद्धा गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे. त्यांनी कायद्याच्या प्रक्रियेचा कोणताही वापर भावनिक पद्धतीने करू नये. चुका टाळल्यास आयुष्याचा मोठा कालखंड त्या चांगल्या अधिकारी म्हणून राहू शकतील, असेही ऍड. असीम सरोदे यांनी सांगितले.

हेही वाचा: श्रीरामपूर : दुचाकींची चोरी करणारा सराईत गजाआड; १२ दुचाकी जप्त

loading image
go to top