

“From Farming to Business: Inside the Rural Livestock Entrepreneurship Initiative”
sakal
अहिल्यानगर: पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबवली जात आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारणे आणि पशुपालनाला व्यावसायिक स्वरूप देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात तब्बल १९ हजार उद्योजक घडवण्याचा उद्देश आहे. राज्य सरकारने पूर्वीच्या योजना एकत्र करून ही योजना आणली आहे.