
शिर्डी : येत्या नाशिक कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावाने स्वतंत्र आखाडा उभारला जाईल. देशभरातील साईभक्तांचा व साईबाबांवर निष्ठा असणाऱ्या संत-महंतांचा त्यात सहभाग असेल. शिर्डीतील साईबाबांचा दरबार हा सनातन हिंदू धर्मावर आधारित आहे. साईबाबांची निंदा करण्यापूर्वी तथाकथित महंतांनी येथे येऊन समक्ष माहिती घ्यावी. साईबाबांचे सनातन हिंदू धर्मासोबत असलेले नाते जगासमोर आणण्यासाठी आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी साईबाबांच्या नावाने आखाडा उभारला जाईल, अशी माहिती हरिद्वार येथील महंत महादेवदास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.