
शिर्डी : साईबाबांना गुरुस्थानी मानणाऱ्या देश-विदेशांतील शेकडो भाविकांनी आज साई मंदिरात येऊन साई समाधीवर आपला माथा टेकवला. साई संस्थानच्या प्रसादालयात आज दिवसभरात पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी भोजन घेतले. साई संस्थानच्या वतीने गुलाबजामची डिश देऊन भाविकांचे तोंड गोड करण्यात आले.