साई संस्थानने अडवली नगरपंचायतीची वाट, भाजपचा ठिय्या

सतीश वैजापूरकर
Friday, 9 October 2020

हा रस्ता नगरपंचायतीचा आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने बाजारपेठेतील महत्वाचा रस्ता आहे. कुठलेही संयुक्तीक कारण नसताना साईसंस्थानने अडथळे उभे करून हा रस्ता बंद केला.

शिर्डी ः द्वारमाई मंदिराजवळून जाणारा नगरपंचायतीचा रस्ता साईसंस्थानने बंद केला. नगराध्यक्ष अर्चना कोते यांनी विनंती करूनही हा रस्ता खुला केला जात नाही. येत्या दोन दिवसांत हा रस्ता खुला झाला नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल. असा इशारा पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिला. 

हा रस्ता खुला करावा, या मागणीसाठी आज भाजपच्या वतीने नगरपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. नितीन कोते, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, नगरसेवक शिवाजी गोंदकर, सचिन शिंदे, किरण बो-हाडे, योगेश गोंदकर, विनोद संकलेचा, संजय संकलेचा, विनोद गंगवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

गोंदकर म्हणाले, हा रस्ता नगरपंचायतीचा आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने बाजारपेठेतील महत्वाचा रस्ता आहे. कुठलेही संयुक्तीक कारण नसताना साईसंस्थानने अडथळे उभे करून हा रस्ता बंद केला. नगरपंचायतीची विनंती एेकण्याची तयारी संस्थानच्या अधिका-यांची नाही. त्या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होते आहे. अन्य लांबच्या रस्त्याचा वापर करण्याची वेळ आली आहे. साईसंस्थानच्या अधिका-यांना जाग आणण्यासाठी आम्ही आंदोलन हाती घेऊ.

काही वेळाने मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व कार्यालयीन अधिक्षक मधुकर देसले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

या बाबत साईसंस्थानने मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे व पोलीस उपाधिक्षक संजय सातव यांच्या सोबत चर्चा करून मार्ग काढू. तोपर्यत आंदोलन मागे घेण्याचा पर्याय त्यांनी मांडला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai Sansthan blocked the road to Nagar Panchayat