esakal | साईसंस्थान नोकरांच्या पतपेढीतर्फे सभासदांना १० टक्के लाभांश वाटप 
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Sansthan Servants Credit Bureau distributes 10 percent dividend to its members

साईसंस्थान नोकरांच्या पतपेढीने दिवाळीनिमित्त सभासदांना १० टक्के डिव्हीडंड, १५ टक्के लाभांश व भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.

साईसंस्थान नोकरांच्या पतपेढीतर्फे सभासदांना १० टक्के लाभांश वाटप 

sakal_logo
By
सतिश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) : साईसंस्थान नोकरांच्या पतपेढीने दिवाळीनिमित्त सभासदांना १० टक्के डिव्हीडंड, १५ टक्के लाभांश व भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. या संस्थेने साईभक्तांना सेवा देत असताना सभासदांच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यावर भर दिला. ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 

संस्थेतर्फे सभासदांना प्रत्येकी दहा किलो साखर, पाच किलो तेल, प्रत्येकी दोन किलो तांदूळ व मिठाईची भेट त्यांच्या हस्ते वितरीत केली त्यावेळी ते बोलत होते. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उपकार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके, आकाश किसवे, दिलीप उगले, संस्थेचे अध्यक्ष यादव कोते, उपाध्यक्ष संदिप बनसोडे, जितेंद्र गाढवे, प्रताप कोते, विलास गोंदकर, दिनेश कानडे, श्रध्दा कोते, संगीता वाणी उपस्थित होते. 

मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे म्हणाले, की येत्या दोन दिवसात साईसंस्थानच्या कर्मचाऱ्यांचा बोनस व थकीत वेतनाबाबत झालेल्या निर्णयानुसार ही रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल. क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी सुत्रसंचालन केले. संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र शेळके यांनी प्रास्ताविक तर प्रताप कोते यांनी आभार मानले. 

संस्थेचे दोन हजार सभासद व तिनशे कर्मचाऱ्यांना दहा टक्‍के डिव्हीडंट व वार्षिक वर्गणीवर पंधरा टक्के लाभांश वाटप केले जाईल. कोविडच्या प्रकोपामुळे संस्थेच्या उत्पन्नावर परिणाम झाला तरीही सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यावर भर दिला आहे. 
- यादवराव कोते, अध्यक्ष साईसंस्थान नोकरांची पतपेढी 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top