
अहिल्यानगर : आजचा संडे काही औरच होता. कडक ऊन असले, तरी वाचकांनी मोठी गर्दी केली. पुस्तकांच्या सहवासाचा गारवा अनुभवला. नवीन लेखकांची नवीन पुस्तके खरेदीबरोबच कायम वाचली जाणारी व प्रत्येक घरात हवीच, अशी पुस्तके अनेकांच्या हाती दिसत होती. आज रविवारची सुटी असल्याने ग्राहकांनी पुस्तक खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला. प्रत्येक स्टॉलमध्ये किमान दहा ते बारा वाचक निवांत खरेदी करताना दिसले.