Ahmednagar News : रुग्णवाहिकाचालकांचे वेतन थकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salaries of ambulance drivers exhausted Ambulance drivers of No 102 work stop protest ahmednagar

Ahmednagar News : रुग्णवाहिकाचालकांचे वेतन थकले

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकाचालकांच्या थकीत वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, विजय मिसाळ, राहुल शिवशरण, बापूसाहेब वाघमोडे, सुधाकर खरात, बी. जी लांडगे, विकास जठर, दत्तात्रेय गवळी, एस. पी. कसबे, दत्तात्रेय गायके, सौरव जाधव, माणिक निकम, शिवाजी देवकर, विजय दराडे, सय्यद फिरोज, पंकज खपके, सोमा येवले, संभा चव्हाण, जेम्स ससाणे, बाबासाहेब नाईक, शंकर जाधव, अनिल हिगडे, अनिल गायकवाड, सुभाष नाईक, किरण गोरे, काशिनाथ नरवडे, साहेबराव थोरात, विनोद घुले आदींसह रुग्णवाहिकाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, की आरोग्य विभागातील कंत्राटी 102 रुग्णवाहिकाचालकांचे मागील सहा महिन्यांचे वेतन कंत्राटदाराकडे रखडले आहे. नगरमध्ये जिल्हा परिषदेची 98 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यासाठी 98 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यावर तेवढेच कंत्राटी वाहनचालक कार्यरत आहेत. पूर्वीच्या कंत्राटदाराने (मे. अष्टविनायक ट्रॅव्हल्स व ईश्वर ट्रॅव्हल्स) वाहनचालकांचे तीन महिन्यांचे वेतन थकवले आहे.

नव्याने कंत्राट दिलेल्या (मे. दृष्टी सिक्युरिटी व पर्सनल सर्व्हिसेस, जळगाव व विन्सोल सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे) या कंपनीनेदेखील पूर्वीच्या कंत्राटदाराप्रमाणेच वाहनचालकांच्या वेतनात दिरंगाई केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर कंत्राटदाराने वाहनचालकांना 11 हजार रुपये वेतन जमा केले. मात्र, मागील दोन महिन्यांचे वेतन सध्याच्या कंत्राटदाराकडे, तसेच पूर्वीच्या कंत्राटदाराकडे तीन महिन्यांचे, असे एकूण पाच महिन्यांचे वेतन थकले आहे.

वाहनचालकांचा पीएफओ आणि विमादेखील कंत्राटदाराने भरलेला नाही. कंत्राटदाराने सर्व वाहनचालकांचे वेळेवर वेतन अदा करणे बंधनकारक आहे. मात्र, त्याच नियमाचा भंग संबंधित कंत्राटदार वाहनचालक संस्थेकडून होत आहे. मागणी पूर्ण न झाल्यास सर्व वाहनचालक उपोषण करणार आहेत.

संबंधित कंत्राटदाराने अटी व शर्तींनुसार वाहनचालकांचे वेतन करायला हवे. त्यासाठी त्याला नोटीस काढण्यात आली आहे. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.

- डॉ. संदीप सांगळे,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :Ahmednagarsalaryambulance