esakal | संभाजी ब्रिगेडचा भर पावसात ,बैलगाडी मोर्चा Nagar
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar

संभाजी ब्रिगेडचा भर पावसात ,बैलगाडी मोर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसमत : येथे आज दुपारी संभाजी ब्रिगेडने भर पावसात बैलगाडी मोर्चा उप विभागीय कार्यालयावर काढला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन हा मोर्चा काढला आहे.

प्रामुख्याने सोयाबीन पिकाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये हमीभावाने खरेदी करावे, वसमत तालुक्यासह व संपूर्ण जिल्ह्यात सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत करावी, जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एक रकमी एफ. आर. पी. देऊन मागील वर्षाची एफ. आर. पी. शिल्लक आहे ती तात्काळ द्यावी, पी. एम. किसान योजनेची नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. हिंगोली जिल्ह्यात पंचनामा न करता सरसगट विमा देण्यात यावा., आरोग्य विभागाच्या भरती गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरपाई देऊन तात्काळ परीक्षा घेण्यात याव्यात. या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: हिंगोली : चौथ्या दिवशीही 'मुसळधार'

वसमत तालुक्यात व हिंगोली जिल्ह्यात अति पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनचे भाव पाडण्यात आले. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन घेण्यात येईल याची गंभीर दखल घेण्यात यावी, असे संभाजी ब्रिगेड हिंगोली जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांनी सांगितले आहे. सुरेश इंगोले, अलोक इंगोले, ज्ञानेश्वर माखणे, विजय डाढाळे, नारायण खराटे, शिवम भोसले, नितीन भोसले यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

loading image
go to top