शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये ॲप घोटाळ्यावरून एक महिन्यापासून चर्चा सुरू आहे. अद्याप देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त मंडळ, कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. देवस्थानने केवळ तीनच ॲपची तक्रार केल्याचे समजले आहे; परंतु या घोटाळ्याची व्याप्ती यापेक्षा मोठी आहे.
नेवासे शहर : शनिशिंगणापूर देवस्थानमधील बनावट घोटाळाप्रकरणी ठोस कारवाई करावी; अन्यथा उपोषण करण्याचे निवेदन मंगळवारी (ता. २४) काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षकांना दिले आहे.