esakal | शेवगावात कोविडच्या काळात वाळूउपसा जोरात
sakal

बोलून बातमी शोधा

नदीपात्रात अवैध वाळूउपसा

सध्या या वाळूचा बेसुमार उपसा करीत आहेत. तालुक्‍यातील मुंगी परिसरातील गोदावरी नदीच्या वाळूला राज्यभरात मोठी मागणी असते. त्यामुळे लिलाव झालेला असो वा नसो तेथे अवैध मार्गाने कायमच वाळू उपसा सुरू असतो.

शेवगावात कोविडच्या काळात वाळूउपसा जोरात

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : तालुक्‍यातील नदीपात्रांतून सर्रार अवैध वाळू उपसा होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील पाणी पातळी खालवली आहे. मार्च एण्ड लक्षपूर्तीनंतर महसूल विभागाची कारवाई थंडावल्याने वाळू तस्करांनी ग्रामीण भागात धुडगूस घातला आहे. एकीकडे प्रशासन कोरोना संकटात व्यस्त असताना अवैध वाळू उपशाला उधाण आले आहे.

तालुक्‍यातून गोदावरी, ढोरा, नंदिनी, काशी, रेडी, अवनी, सकुळा या प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांना मिळणाऱ्या उपनद्या, ओढे-नाल्यांनी तालुक्‍याचे भौगोलिक क्षेत्र व्यापले आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने या नद्या-नाले खळखळून वाहिले. मात्र पाण्याबरोबर वाहून आलेल्या वाळूवर वाळू तस्करांची वक्रदृष्टी पडली आहे. (Sand is being stolen from the river basin in Shevgaon)

हेही वाचा: वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

ते सध्या या वाळूचा बेसुमार उपसा करीत आहेत. तालुक्‍यातील मुंगी परिसरातील गोदावरी नदीच्या वाळूला राज्यभरात मोठी मागणी असते. त्यामुळे लिलाव झालेला असो वा नसो तेथे अवैध मार्गाने कायमच वाळू उपसा सुरू असतो.

मराठवाड्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळूचे लिलाव झालेले आहेत. मात्र तालुक्‍यातील नदी पात्रातील वाळूचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याकडे महसूल व पोलिस प्रशासनाची डोळेझाक होत आहे. मार्च महिन्यात महसूल विभागाचे सर्वच अधिकारी व कर्मचारी लक्ष पूर्तीसाठी अवैध वाळू, माती, डबर, मुरूम उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी रात्रंदिवस रस्त्यावर होते. मात्र, त्यानंतर वर्षभर अशा गौण खनिजाचा अवैध उपसा सुरूच असल्याने त्यातून पर्यावरणाची अपरिमित हानी होते. वाळूचा बेकायदा उपसा कोणाच्या आशीर्वादाने होतो, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लागेबांधे ?

वाळू उपशासाठी वाहन नदीपात्रात गेल्यापासून ते थेट संबंधित ग्राहकांपर्यंत पोहचेपर्यंत काही ठराविक व्यक्ती प्रमुख रस्ते, बसस्थानक चौक, तहसील कार्यालय, निवास येथे रात्री अपरात्री थांबून अधिकाऱ्यांचा मागमूस घेत असतात. शिवाय काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अवैध वाळू व्यावसायिकांशी लागेबांधे असल्याने ते कधीही कारवाईच्या कचाट्यात सहजासहजी सापडत नाहीत. त्यामुळे अवैध वाळू उपशसा सुखेनैव सुरू असतो.(Sand is being stolen from the river basin in Shevgaon)