Sand Mining Rampur: वाळू उपशाला विरोध, महिलांवर दगडफेक; रामपूर येथील घटना, ग्रामस्थांचाही प्रतिहल्ला केल्याचा ठेकेदाराचा दावा..

Protest Turns Violent, Stone Pelting Reported: सरकारी वाळू लिलावाला रामपूर ग्रामस्थांचा ठाम विरोध; महिलांवर दगडफेक, ठेकेदार समर्थक व ग्रामस्थ आमनेसामने, पोलिस व प्रशासन पुढील कारवाईच्या तयारीत
Sand Extraction Dispute Leads to Stone Pelting Incident in Rural Rampur

Sand Extraction Dispute Leads to Stone Pelting Incident in Rural Rampur

sakal

Updated on

​श्रीरामपूर: रामपूर येथे सरकारी टेंडर झालेल्या जागेतून वाळू वाहतुकीसाठी रस्ता तयार करणाऱ्या ठेकेदाराच्या समर्थकांनी स्थानिक महिलांवर दगडफेक केल्याची घटना आज (ता.१९) घडली. वाळू उपशाला विरोध करण्यासाठी गोदावरी पात्राकडे धावून गेलेल्या ६० ते ७० महिलांवर हल्ला झाला. ग्रामस्थांनीही दगडफेक केल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. यात कोणी गंभीर जखमी झाले नाही. श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com