
कोल्हार घोटी राज्य मार्गावर खासगी बसच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. खासगी बस शिर्डीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. खासगी बस आणि आंब्याच्या ट्रकची पहाटे धडक झाली. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते.