

संगमनेर : “विरोधकांबाबत आजपर्यंत कधीही आडमुठी भूमिका घेतली नाही. महाविद्यालयांसाठी परवानग्या दिल्या, संस्था मजबूत केल्या. तरीही आज काही लोक आम्हाला विचारतात की गेल्या चाळीस वर्षांत काय केले ? आम्ही येथे जे वैभव उभे केले आहे. ते उद्ध्वस्त करण्याचे काम काही मंडळीकडून सुरू आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांचा समाचार घेतला.