esakal | संगमनेर : बिबट्याने पाडला शेळीचा फडशा
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

संगमनेर : बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बोटा : संगमनेर तालुका सीमेवर असलेल्या भोजदरी गावांतर्गत येणाऱ्या दारसोंडवाडीमधील लक्ष्मण कडाळे यांची शेळी बिबट्याने शुक्रवारी (ता. १०) दुपारी ठार केल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी दारसोंडवाडी येथील लक्ष्मण कडाळे व त्यांच्या पत्नी जाईबाई या शुक्रवारी दुपारी शेताजवळ शेळ्या चारत असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळीवर हल्ला केला. मदतीसाठी जाईबाई यांनी मोठ्याने आरडाओरडा केला, पण तोपर्यंत शेळी ठार करून बिबट्या पळून गेला. या घटनेची माहिती वन विभागाचे कर्मचारी दिलीप बहिरट यांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृत शेळीचा पंचनामा केला.

loading image
go to top