संगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

निमगाव खुर्द येथील घटना
महिला ठार
महिला ठारsakal

संगमनेर : तालुक्यातील निमगाव खुर्द येथील चंदन टेकडी परिसरात राहणाऱ्या मीराबाई रामभाऊ मेंगाळ यांना झोपेत असताना बिबट्याने ओढून नेले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.निमगाव खुर्द परिसरात राहणाऱ्या मिराबाई यांचा शेळ्या पालनाचा व्यवसाय होता. शेळ्या वाडग्यात कोंडून ती नेहमीप्रमाणे झोपडीत अंगावर काळ्या रंगाची वाकळ घेवून झोपल्या होत्या.

त्यांच्या सोबत २२ वर्षे वयाचा दिव्यांग मुलगाही होता. वाडग्याच्या जवळपास भक्षाच्या शोधार्थ फिरणाऱ्या बिबट्याला झोपडीतील हालचाल जाणवल्याने त्याने तत्काळ झडप घेवून त्यांची मान तोंडात पकडून फरफटत नेले. या घटनेच्या चाहुलीने जाग आलेल्या मुलाने आरडाओरड केल्याने परिसरातील लोक धावले. तो पर्यंत बिबट्या मिराबाई यांना घेवून दिसेनासा झाला. शोध घेतला असता ५०० मीटर अंतरावर मृतदेह पडलेला दिसला. माणसांच्या चाहुलीने बिबट्याने शिकार सोडून पलायन केले होते. या हल्ल्यात तिची मान, तोंड व छातीला प्राणघातक जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती स्थानिक वन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब गोपाळे यांनी संगमनेर वनपरिक्षेत्र -१ चे वनक्षेत्रपाल सचिन लोंढे यांना दिली. तर पोलिस पाटील गोरक्ष गोपाळे यांनी पोलिसांना माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com