
श्रीरामपूर : शहरातून जाणाऱ्या संगमनेर-नेवासे रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यानंतर जुना रस्ता खोदून खडीकरण व मुरुमाचा एक थर झाल्यानंतर आज (ता.२७) सायंकाळी या रस्त्यावर एक माल वाहतूक ट्रक फसल्याने या रस्त्याचे शुक्लकाष्ट संपण्याचे चिन्हा दिसत नाही. तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला खरा मात्र, निकृष्ट होत असलेल्या कामामुळे रस्ता होण्याआधीच खड्ड्यातच जातो की काय, अशी शंका श्रीरामपूरकरांच्या मनात निर्माण झाली आहे.