
संगमनेर: पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे या उद्देशाने संगमनेर नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी नगरपरिषदेसोबत विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले होते.