esakal | संगमनेर : सायखिंडी शिवारात खासगी बस उलटली
sakal

बोलून बातमी शोधा

Sangamner

संगमनेर : सायखिंडी शिवारात खासगी बस उलटली

sakal_logo
By
सकाळी वृत्तसेवा

संगमनेर : नाशिक (Nashik) कडून पुण्याकडे (Pune) प्रवासी वाहतूक करणारी खासगी आरामबस (Bus) चालकाचे (Driver) नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या (Expressway) कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या अपघातात (Accident) वाहनाचा क्लिनर (Cleaner) व चार प्रवासी (Passenger) किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी संगमनेर (Sangamner) येथील खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी आज सकाळी नाशिक कडून पुण्याकडे जाणारी व खासगी आरामबस एम एच 04 जीपी. 7865 हॉटेल कृष्णा गार्डन पासून 200 मीटर पुढे अंतरावर चालक शिवदास भिकाजी आव्हाड यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात बसमधील क्लीनर शंकर त्र्यंबक श्रीराम व इतर चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना टोल ॲम्बुलन्सने संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करण्यासाठी पाठवले आहे

Sangmaner

Sangmaner

हेही वाचा: महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी सकाळी केले जलपूजन;पाहा व्हिडिओ

अपघात ग्रस्त बस क्रेनच्या साह्याने बाजूला घेण्याचे काम चालू असून, महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व त्यांचे सहकारी यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.

loading image
go to top