
संगमनेर : तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने गावांची नावे असणारे फलक लावले; मात्र फलकांवर गावांची नावे चुकून ठेवली होती. घुलेवाडीचे धुलेवाडी, मालदाडचे मालदंड केल्याचे पहावयास मिळाले. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन त्वरित फलकांवर चुकलेल्या गावांच्या नावांची दुरुस्ती केली आहे.