esakal | कोरोना दूधउत्पादकांमागे ः संगमनेर तालुक्याने दुधाबाबत घेतला हा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Sangamner taluka reduced the price of milk by Rs

कोरोनामुळे बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाले आहेत व उठाव नसल्याने संपूर्ण पावडर व बटर पडून आहे. खासगी प्रकल्पाचे दरही 18 ते 20 रुपये आहेत.

कोरोना दूधउत्पादकांमागे ः संगमनेर तालुक्याने दुधाबाबत घेतला हा निर्णय

sakal_logo
By
आनंद गायकवाड

नगर ः कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे अनेक उद्योगांवर त्याचा परिणाम झाला. गोरगरिबांनाही त्याचा फटका बसतो आहे. शेतकऱ्यांचेही त्याने कंबरडे मोडले आहे. शेतीपूरक जोडधंदा म्हणून दूधाकडे पाहिले जात होते. परंतु हा व्यवसायही मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे.

संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे बाजारात स्कीम मिल्क पावडर व बटरचे दर कमी झाल्याने दूध संघाने 1 जुलैपासून गाईचे पन्नास टक्के दूध वीस रुपये, तर पन्नास टक्के दूध पंचवीस रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केले जाणार असल्याचे सांगितले आहे.

संघाच्या कार्यकारी संचालकांनी दोन दिवसांपूर्वी दूधसंकलन करणाऱ्या संस्थांना पत्र देऊन कळवले आहे. खासगी दूध संघासोबत आता सहकारी दूध संघही दर कमी करू लागल्याने दूधउत्पादक हतबल झाले आहेत. 
दरम्यान, राज्य शासनाच्या महानंद दूध संघाचे अध्यक्ष असलेले रणजितसिंह देशमुख हे या तालुका दूध संघाचे अध्यक्ष असून, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे या संघावर वर्चस्व आहे. 

हेही वाचा - रोहित पवार यांच्या मतदारसंघातील महामार्ग गेला खड्ड्यात

कोरोनामुळे बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाले आहेत व उठाव नसल्याने संपूर्ण पावडर व बटर पडून आहे. खासगी प्रकल्पाचे दरही 18 ते 20 रुपये आहेत. त्यामुळे दूध संघाने 1 जुलैपासून गाईचे पन्नास टक्के दूध वीस रुपये, तर पन्नास टक्के दूध पंचवीस रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र दूधसंकलन करणाऱ्या संस्थांना पाठवले आहे. पावडर व बटरला मागणी वाढून दरात सुधारणा झाल्यानंतर दूधदराबाबत कळवले जाईल, असेही पत्रात नमूद केले आहे. 

दरम्यान, दूधउत्पादकांना सरकारने प्रतिलिटर किमान पाच रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी दूधउत्पादक शेतकरी करत आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर