संगमनेर : वीजतारा चोरताना फास बसून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitaran

संगमनेर : वीजतारा चोरताना फास बसून मृत्यू

बोटा: टॉवरच्या वीजवाहक तारा चोरताना पोटास दोरीचा फास लागून एकाचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने उच्च दाब वीजवाहिनीच्या टॉवरवर चढून तार कापताना ती तुटतेवेळी पोटास बांधलेल्या दोरीचा फास लागला. त्यात एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी(ता.६ मार्च) पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान घडली.

योगेश रावसाहेब दिघे असे मृत्यू झालेल्या वीस वर्षीय तरूणाचे नाव आहे. वडील रावसाहेब सुखदेव विघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुध्द घारगाव पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. या संबंधित एक मोटार व टेम्पोही जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार विशाल पंडीत, आदित्य सोनवणे (दोघेही रा.शिंदोडी) योगेश रावसाहेब विघे (रा.पिलानी वस्ती चिकलठाण ता.राहुरी), संकेत दातीर (रा.प्रिंप्रिलौकी) व सरफराज शेख (रा.रामगड ता.श्रीरामपुर) तसेच एक अल्पवयीन या सर्वांनी योगेश रावसाहेब विघे यास पहाटे एक ते तीनच्या दरम्यान शिंदोंडी शिवारात आणले.

टॉवरची अतिउंची पाहूनही योगेश विघे यास चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने विजेच्या टॉवरवर चढवून अ‌ॅल्युमिनिअमच्या विजेच्या तारा कापण्यास सांगितले. कापलेल्या तारांपैकी एक अल्युमिनिअम धातूची तार तुटताना योगेश याच्या पोटास बांधलेल्या दोरीने फास बसला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या पाच आरोपींनी मोटारी (एमएच २० एजी.५२५८)मधून योगेश विघे यास औषध उपचारासाठी लोणी येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी रावसाहेब सुखदेव विघे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार घारगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.वीजतारा चोरताना फास बसून मृत्यूसंगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारातील घटना

Web Title: Sangamner Trapped Death Stealing Electricity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top