संगमनेरात दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली

आनंद गायकवाड
Friday, 12 February 2021

संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह गस्तीवरील पोलिस पथकाला गुंजाळवाडी- घुलेवाडी रस्त्यावरील बोगद्याजवळ पाच जण संशयास्पदरीत्या उभे असल्याची माहिती मिळाली.

संगमनेर : गुंजाळवाडी शिवारातील बोगद्याजवळ संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या पाच व्यक्तींचा गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करीत चौघांना पकडले. एक जण पळून गेला. त्यांच्याकडून दोन दुचाकी, धारदार शस्त्रे, मिरचीपूड, तसेच चार मोबाईल जप्त केले. 

जालिंदर मच्छिंद्र बर्डे (वय 30), गणेश ऊर्फ अजय मच्छिंद्र गायकवाड (वय 23, दोघे रा. गुहा, ता. राहुरी), लखन अर्जुन पिंपळे (वय 30, रा. मनेगाव, ता. सिन्नर), सोमनाथ अर्जुन पवार (वय 21) यांना अटक केली. अशोक हरिभाऊ बनोटे (रा. श्रीरामपूर) पसार झाला. 

अधिक माहिती अशी ः संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह गस्तीवरील पोलिस पथकाला गुंजाळवाडी- घुलेवाडी रस्त्यावरील बोगद्याजवळ पाच जण संशयास्पदरीत्या उभे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून छापा घातला.

हेही वाचा - विखे पाटलांच्या हाती जामखेडचा युवा चेहरा

पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून चौघांना पकडले. एक जण पसार झाला. त्यांच्याकडून दोन दुचाकी, धारदार शस्त्रे, कटावणी, दोरी, मिरचीपूड, चार मोबाईल, असा सुमारे 52 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, हवालदार अमित महाजन, पोलिस नाईक विजय पवार, विजय खाडे, अविनाश बर्डे, ज्ञानेश्वर सोनवणे, सचिन उगले, सुरेश मोरे यांच्या पथकाने केली. 
..... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangamnera, a gang was caught preparing for a robbery