
सोनई : शनिशिंगणापूर येथील देवस्थान हिंदूंचे म्हणून जिवंत राहावे याकरिता प्रत्येकाने यापुढे सजग व जागृत राहणे आवश्यक आहे. गैरहिंदू असलेल्या ११४ जणांना शनिदरबारात पायघड्या घालणाऱ्या विश्वस्त मंडळाचा बंदोबस्त करण्यासाठी यापुढे लढा असणार आहे. देव, देश आणि धर्म याकरिता कुठलाही समझोता करू नका, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.