
MLA Sangram Jagtap addressing a massive crowd during the Shivshakti–Bhimshakti Morcha in Ahilyanagar.
Sakal
अहिल्यानगर: महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही. ईदच्या वेळी साहित्य खरेदीसाठी अगोदर त्यांनी पत्रके वाटली. त्यावेळी समाजातील काही धर्मगुरूंना आपण भेटून हा प्रकार थांबविण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते. त्यामुळे आता आपणही कृती करण्याची गरज असल्याची भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केली.