संग्राम पतसंस्थेतर्फे सभासदांना 15 टक्के लाभांश

आनंद गायकवाड
Sunday, 15 November 2020

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चालविल्या जाणाऱ्या व नाशिक विभाग कार्यक्षेत्र असणाऱ्या संग्राम पतसंस्थेने कायम सभासदहिताचे निर्णय घेतले.

संगमनेर (अहमदनगर) : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चालविल्या जाणाऱ्या व नाशिक विभाग कार्यक्षेत्र असणाऱ्या संग्राम पतसंस्थेने कायम सभासदहिताचे निर्णय घेतले. या वर्षी संस्थेच्या सभासदांसाठी 15 टक्के लाभांश बॅंकेत वर्ग करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक उमेश शिंदे यांनी दिली. 

सामाजिक उपक्रमात भरगच्च आर्थिक मदत करण्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेने जागतिक कोरोना संकटात तालुक्‍यातील गोरगरीब जनतेला तेल व किराणा साहित्याचे वाटप केले. सन 2019-2020 या आर्थिक वर्षात संस्थेला 1 कोटी 55 लाखांचा नफा झाला असून, संस्थेच्या 70 कोटी 22 लाखांच्या ठेवी आहेत. या कालावधीत 53 कोटी 63 लाख रकमेचे कर्जवाटप केले. सुरक्षित गुंतवणूक 36 कोटी 74 लाख, स्वनिधी 13 कोटी 40 लाख, तसेच संस्थेच्या कर्मचारीवर्गास भरघोस दिवाळी बोनस दिला. संस्थेने ठेवींवर आकर्षक व जास्त व्याज देण्याचे धोरण या वर्षीही ठेवले. तसेच, कर्जासाठी कमीत कमी व्याजदर ठेवला आहे. संस्थेकडे ठेवीदार व कर्जदारांचा ओघ वाढत आहे. संस्थेला या वर्षी "अ' ऑडिट वर्ग मिळाला आहे. 

पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. राणीप्रसाद मुंदडा, संचालक डॉ. दत्तात्रेय शिंदे, विलास दिघे, माणिक शेवाळे, सूर्यकांत शिंदे, राजेंद्र काजळे, विजय गिरी, सुलभा दिघे, सुनंदा दिघे, किशोर टोकसे, ऍड. प्रशांत गुंजाळ आदी उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangram Patsanstha pays 15 percent dividend to its members