
अहिल्यानगर : अरुणकाका गेल्याचे खूप दु:ख होत आहे. जगताप परिवारावर कोसळलेल्या या दु:खातून तुम्ही स्वतःला सावरा, काकांचे अपुरे राहिलेले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांची काळजी करू नका, मी स्वतः त्यांची जबाबदारी घेतो, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्वती जगताप यांना आधार देत त्यांचे सांत्वन केले.