esakal | १५ वर्षापूर्वीच्या अनुभवाने शिपणरचा बेलाग सुळका सर
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Tahane climbed the cone of Kela Konkanwada

कोकणकड्यावरुन डाव्या बाजूला एक सुळका दिसतो. त्याच्या वाटेला कुणी जात नाही आणि आजवर फारसं याच्यावर कुणी गलेलं नाही.

१५ वर्षापूर्वीच्या अनुभवाने शिपणरचा बेलाग सुळका सर

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : कोकणकड्यावरुन डाव्या बाजूला एक सुळका दिसतो. त्याच्या वाटेला कुणी जात नाही आणि आजवर फारसं याच्यावर कुणी गलेलं नाही. कारणही तसेच आहे. एकतर वाट पडलेली नाही आणि दुसरं म्हणजे त्यावर बोल्टींग झालेलं नाही. फ्री क्लाईंब करून जावे लागते. बऱ्याच वर्षांपूर्वी आमचे मित्र शिंदे व संजय सहाणे तिथल्या दोनपैकी एका सुळक्यावर जाउन आले होते. 

दुसरा अतिशय अवघड आहे पण आम्ही आमचा जूना मार्गदर्शक, मित्र चंद्रकांत भगत आम्हाला अलंग मदनवर १५ वर्षांपूर्वी घेऊन गेला होता. त्यांच्या मदतिने हा शिपणरचा बेलाग सुळका सर केला. सोबत धनंजय वाकचौरे व संजय सहाणे हे होते,  असे डॉ. विकास वाकचौरे यांनी सांगितले. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत किंवा दिवाळीत गड किल्ले सर करून रेकॉर्ड बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजपर्यंत पन्नसीपेक्षा अधिक गड सुळके त्यांनी सर केले. मात्र हा सुळका विलक्षण व जीव टांगणीला लावणारा मात्र सामर्थ्य व चिकाटीने हा सुळका त्यांनी अखेर सर केला.

एकंदरीत कारवीमधून रस्ता करत जाणे आणि तिथपर्यंत पोहचणे हेच दिव्य आहे. मात्र सुळक्यावर फ्री क्लाईंब करणे त्याहून थरारक आहे. भगतने ते आव्हान त्याचा आजवरचा अनुभवपणाला लावून लिलया पेलले. अर्ध्यावर पहार दगडात खोचून त्याला दोर लावला व वरती अजून एक दोर लावून आम्ही वर गेलो.

खरंतर आधिच्या सळक्यावर चढून ऊतरताना आमची हवा टाईट झाली होती. पण थोडी पोटपूजा केल्यावर भगतने नेहमिच्या स्टाईलने बरंमी जाऊंन पाहतो असं म्हटल्यावर ठोकाच चुकला. त्याने कमरेला दोर बांधला आणि हळूहळू करत वर जावू लागला. आम्ही फक्त पहात होतो. निम्यावर एक दोर लावून वरती आणखी दूसरा दोर लावला व आम्ही एक एक करत चौघेही सूळक्यावर पोहचलो. 

संपादन : अशोक मुरुमकर