
कोपरगाव: संजीवनी युनिव्हर्सिटीचे आठ विद्यार्थी नुकतेच पंधरा दिवसांच्या इंटर्नशिपसाठी रशियाला रवाना झाले. संजीवनी युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली. संजीवनी युनिव्हर्सिटी आणि रशियातील नामांकित उरल फेडरल युनिव्हर्सिटीत सामंजस्य करार झाला, त्याचे हे फलीत आहे. या विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्यासह तेथील निवास व भोजनाचा खर्च फेडरल युनिव्हर्सिटी करणार आहे, अशी माहिती संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी दिली.